सदभाव

सदभाव प्रोफाइल  – सदभाव केंद्र हे एक व्यसनमुक्ती निदान, उपचार व पुनर्वास केंद्र आहे. व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी ह्या केंद्राची स्थापना हि १९८८ मध्ये करण्यात आली. स्थापना मनोविक श्री. अशोक शुक्ल यांच्या अध्यक्षेत झाली. त्यांचे सोबत सायकियाट्रिस्ट डॉ. प्रकाश नेमाडे, डॉ. उल्हास कडुस्कर, डॉ. प्रकाश भंगाळे, श्री. उत्तमसिंह फुटाणे, डॉ. श्री. नरेंद्र दाभोळकर, उच्च न्यायालयीन सेवा निवृत्त श्री. चंद्रशेखर धर्माधिकारी, सिव्हिल सर्जन डॉ. एस. के. बनसोडे, इत्यादी महानुभावांनी आपले सक्रिय योगदान केंद्राच्या विकास कामात दिले. उद्द्योगपती श्री. भवरलाल जैन, स्थानिक नेते श्री. सुरेशदादा जैन, अॅड. श्री. सुनील अत्रे, खासदार स्व. श्री. वाय. एस. महाजन यांचेही योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. या केंद्रा द्वारा संपूर्ण महाराष्ट्रात व मध्यप्रदेश मध्ये नशाखोरी च्या विरोधात जनजागृती चे कार्य केले गेले

भरती प्रक्रिया
भरती प्रक्रिया – १. जळगाव महाराष्ट्र येथे प्रवेश प्रक्रिया – रोज सकाळी १० पासून संध्याकाळच्या ७ वाजे पर्यंत कोणत्याही प्रकारची सुटी नसते. जर रात्री उशिरा पेशंट अॅडमिट करावयाचा असल्यास तसे फोन वर आधी कळवणे अनिवार्य आहे. २. प्रवेश घेते वेळी रु. १२००० मात्र जेवण, नाश्ता इ. चा खर्च जमा करणे अनिवार्य आहे. प्रवेश घेतल्यावर दोन दिवस नंतर पेशंटचे संपूर्ण निदान केले जाते, त्यात रक्त तपासणी, त्याची संपूर्ण शारीरिक तपासणी व मानसिक तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून केली जाते. त्याच्या आधारावर पेशंटचे मेडिकल बिल दिले जाते, जे भरती झाल्यावर ७ दिवसांमध्ये जमा करणे अनिवार्य असते.
सूचना/अलर्ट – प्रवेश घेते वेळी रु.१२००० जमा केल्यावर ते कोणत्याही परिस्थितीमध्ये परत दिले जात नाही. पैसे दिलेल्या वेळेत जमा न केल्यास व्यसनपीडिताचा डिस्चार्ज केला जातो.
उपलब्धता – साप्ताहिक आजचे विज्ञान, डॉ. अशोक शुक्ल यांनी स्वतः लिहिलेले पुस्तक “व्यसनमुक्ती रहस्य”, लायब्ररी, डेली न्युज पेपर्स.
संपर्क करण्याची वेळ व माहिती – अॅडमिशनसाठी रोज सकाळी ८ ते संध्याकाळी ८ वाजता व डिस्चार्ज ची वेळ सकाळी १० ते संध्या ७ पर्यंत मर्यादित असते. कोणत्याही कारणास्तव सकाळी १० चे आत व संध्या. ७ नंतर पेशंटला डिस्चार्ज दिला जात नाही.
उपचार कार्यक्रम – व्यसनमुक्ती केंद्रांतील दैनंदिन कार्यक्रम – सकाळी ६ वाजता – प्रातविधी , ७ वाजता पि.टी.- योगा-प्राणायाम, ९ वाजता नाश्ता, मेडिकल चेकअप, प्रार्थना, १० वाजता शेअरिंग, ११ वाजता ग्रुप लेक्चर, १२ वाजता परामर्श, दुपारी १ वाजता जेवण व आराम, ४ वाजता चहा बिस्कीट, ४.३० वाजता पि.टी., योगा, ध्यान, प्राणायाम, मौन संध्याकाळी ६ वाजता प्रार्थना व दूध वाटप, ७ वाजता मेडिकल चेकअप, ८ वाजता भोजन ९ ते १० मनोरंजन व विश्रांती.
उपचार घेतेवेळी रुग्णांना  दिले जाणारे शिक्षण – मनोअध्यात्मिक प्रवचन, शेअरिंग, कौन्सलिंग, पि.टी., योगा, प्राणायाम, ध्यान, मौन, सदभाव  परिवाराची सूत्रे,  व्याख्या, आरोग्यवर्धक सवयी, आजारांपासून बचावाचे उपाय, झोप न येण्याची कारणे व उपाय, मानसिक सुधार, व्यक्तिमत्व विकास इत्यादि.
करियर – आमचे सोबत काम करण्याची इच्छा असल्यास कृपया आपला बायोडाटा संपूर्ण माहितीसह आमच्या दिलेल्या ईमेल आयडीवर किंवा दिलेल्या पत्यावर पाठवावा. योग्य व पात्र व्यक्तींना इंटरव्ह्यूसाठी बोलावण्यात येईल. अनुभवी व्यक्तीस प्राधान्य दिले जाईल किंवा बिना अनुभव व्यक्तीस ट्रेनिंग दिली जाईल.

आमचे ध्येय
आमचे ध्येय – व्यसनमुक्त समाज निर्मिती हे आमचे ध्येय व स्वप्न आहे. याला प्रत्यक्ष रूपात साकारण्यासाठी आम्ही जनजागृती कार्यक्रम, प्रचार प्रसार कार्य, व्यसनमुक्ती उपचार केंद्र, पुनर्वास कार्य इ. द्वारा सन १९८४ पासून निरंतर कार्य करीत आहोत. प्रत्येक दिवशी क्षणोक्षणी आमची संस्था आपल्या ध्येयाला प्राप्त करण्यासाठी निरंतर कार्य करीत आहे. आमचे साठी व्यसनमुक्त समाज निर्मिती, हीच राष्ट्रभक्ती, धर्मपालन, तसेच ईश्वराची भक्ती आहे. हाच आमच्यासाठी मानवधर्म आहे. व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी आम्ही व्यसनमुक्त भारत अभियान सुरु केले आहे. या अभियानात आम्ही भारतातील सर्व लोकांनां संगठीत व जागृत करून व्यसनमुक्त  भारत निर्मितीसाठी आगामी दहा वर्षांत सर्व अमली पदार्थांचे उत्पादन व विक्री पूर्णपणे थांबविण्यासाठी सर्व स्थरांवर योग्य ते परिवर्तन करण्यासाठी कार्य करीत आहोत. व्यापक व परिणाम कारक कायदे, विद्यार्थी व युवा वर्गामध्ये जनजागृती, शिक्षणामध्ये व्यसन प्रतिबंधक शिक्षणाचा अंतर्भाव करणे, अंमली पदार्थांच्या विरोधातील कायद्यांचे अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम यंत्रणा उभी करणे इ. कार्यक्रम आहेत. आमच्या केंद्रात व्यसनमुक्तीसाठी आधुनिक विज्ञानधिष्टीत व मनोअध्यात्मिक उपचार पध्दतीचा अवलंब केला जातो. सदभाव व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनपीडित व्यक्तीची विचारधारा, दृष्टीकोन व जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडवून त्यात विवेकशील व वैज्ञानिक दृष्टीकोनाची स्थापना करण्याचे प्रयत्न केले जातात. व्यसनपिडीत व्यक्तीच्या स्वस्थविरोधी, व्यक्तिमत्व व कुटुंब विरोधी सवयी बदलून सुनियंत्रित सुनियोजित जीवनशैली आचरणात आणण्याचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाते. आमचे संगठन व्यसनपीडित व्यक्ती व त्याच्या कुटुंबाला अखेरपर्यंत उपचाराची सुविधा, कॉऊन्सलिंग, मार्गदर्शन व सहायता करते. सद्भाव व्यसनमुक्ती केंद्र सदैव व्यावसायिक, नैतिक, कायदेशीर व मानवधर्माचा मापदंडांचे पालन करते. व्यसनपीडित व्यक्ती हाच आमच्यासाठी परमेश्वर असून त्याला व्यसनमुक्त करणे हाच आमचा धर्म व राष्ट्रभक्ती आहे. सदभाव व्यसनमुक्ती केंद्र हे व्यसनपीडित व त्यांचे कुटुंबियांसाठी त्यांचे माहेरघर आहे. 

गुणवत्ता धोरण
गुणवत्ता धोरण – सदभाव व्यसनमुक्ती केंद्र हे व्यसनपीडित व्यक्तीशी केंद्रित आहे. व्यसनपीडित व्यक्ती व त्याचे कुटुंबियांचे कल्याण हेच आमचे अंतिम ध्येय आहे. त्यासाठी त्यांना सर्वोत्तम सेवा देणे, त्यांचे प्रभोधन करणे, त्यांना  व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करणे यासाठी आम्ही तन, मन व धनाने सदैव प्रयत्नशील असतो. सदभाव व्यसनमुक्ती केंद्र व्यसनपीडित व्यक्ती व त्यांचे कुटुंबियांशी कुठलाही भेदभाव न करता आपले कर्तव्य म्हणून मोकळ्या मनाने व समर्पित भावनेने वागत असते. सदभाव व्यसनमुक्ती केंद्रात व्यक्तीच्या मानसिक शक्तींचा व सद्गुणांचा विकास याला सर्वोतोपरी महत्व दिले जाते. संगठीतपणे टीम वर्क करून नवीन ज्ञान, विज्ञानाची मदत घेऊन आम्ही हे कार्य करीत असतो. आम्ही सदैव व्यसनपीडित व्यक्ती व त्यांच्या कुटूंबियांच्या अडचणी, दोष, त्यांचे अज्ञान इ. चा सातत्याने अभ्यास करीत असतो व त्यांच्या परिवर्तनासाठी सदैव प्रयत्नशील असतो. आम्ही आमच्या कार्याची सतत समीक्षा करून त्यातील दोष व उणीवा  यांच्यामध्ये सुधारणा व परिवर्तन घडवून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतो. आमच्यावर केलेली टीका आम्ही गांभीर्याने घेऊन त्यातील सत्य तपासण्याचा प्रयत्न करतो. परंतु दोष काढणारे किंवा टीका करणाऱ्यांची अवहेलना करीत नाही. सदभाव व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक मनोवैज्ञानिक श्री. अशोक शुक्ल यांनी सदभाव व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करतांनाच सतत सुधार व गुणवत्ता प्राप्ती हे आपल्या कार्य पद्धतीत समाविष्ट केले होते. हे वैशिष्ट्य सदैव जोपासले जाईल याची आम्ही ग्वाही देतो.

शारीरिक सुधार
शारीरिक सुधार – वैद्यकिय सुधार किंवा उपचारचेही पाच भाग पडतात. 

अ . विरहवेदनाचे नियंत्रण  – कोणतेही व्यसन अचानक बंद केल्यावर व्यसनपीडित व्यक्तीच्या शरीरात अनॆक उपद्रवी लक्षणे दिसू लागतात. उदा. कापरे सुटणे, अंग दुखणे, बेचेनि वाटणे, उलट्या-मळमळ होणे, नाकातून डोळ्यातून पाणी येणे, जांभया येणे, भ्रम होणे इत्यादी. या लक्षणांना विरह वेदना असे म्हणतात. काही वेळा या विरह वेदना जीवघेण्या असतात. व्यसनमुक्ती केंद्रातील तज्ञ मंडळी औषधोपचाराच्या साहाय्याने विरह वेदनांचे नियंत्रण व उपचार करतात. तथापि घरी व्यसन सोडू इच्छिणाऱ्या लोकांना विरह वेदनांचा धोका असतो. तसेच विरह वेदनांच्या भीतीमुळेच व्यसनी लोक घरी व्यसन सोडण्यात यशस्वी होत नाहीत. उलट अनेकदा मेडीकल प्रॉब्लेम उत्पन्न होतात व मग हॉस्पीटलकडे धाव घ्यावी लागते. 

ब.  निर्विषीकरण(डिटॉक्सिफिकेशन) – अमली पदार्थ हे स्लो पॉइझन असतात. दीर्घकाळ व्यसन केल्यानंतर हे विष आपल्या सर्व शरीरात पसरते व त्याचे दुष्परिणाम होतात. विशेषतः लिव्हर, मूत्रपिंड, त्वचा इत्यादी अवयवांवर अंमली पदार्थांचे दुष्परिणाम तीव्रतेने जाणवतात. लिव्हरवर सूज येते. तर काही वेळा जलोदरही होतो. तज्ञ डॉक्टर्स पूर्ण तपासणी करून औषधोपचार करतात. २ ते ३ आठवड्यात निर्विषीकरणाचे काम पूर्ण होते. 

क.  कुपोषण दूर करणे – व्यसनपीडित व्यक्ती व्यसनाधीन असतांना व्यवस्थित व पोटभर जेवत नाही. त्याच्या जेवणात समतोल आहार नसतो, तर अनेकदा तो जेवतही नाही, याचा परिणाम म्‍हणून त्यांचे शरीर कुपोषित होते. सद्भाव व औषधी व्यसनमुक्ती केंद्रात साधे संतुलित जेवण, दूध व केळी असा आहार दिला जातो. त्यामुळे एका महिन्यात व्यसनपीडित व्यक्तिचेही कुपोषण दूर होते. त्यामुळे २ ते ५ किलो वजन वाढते. 

ड.  अन्य आजारांचा उपचार – व्यसनपिडीत व्यक्तीला व्यसनामुळे अनेक आजार जडतात. पण व्यसनाच्या बेहोषीत त्याला त्या आजाराची जाणीव होत नाही. व्यसनमुक्ती केंद्रात अंमली पदार्थांचे सेवन बंद झाल्यामुळे व्यसनपिडीत व्यक्तीचे शरीर संवेदनशील होते व त्याला छोट्या-मोट्या आजारांची जाणीव व्हायला लागते. या सर्व आजारांची तपासणी व उपचार सद्भाव व्यसनमुक्ती केंद्रात होतात. 

इ.   आरोग्यवर्धक सवयी आत्मसात करणे – व्यसन लागण्याचे मुख कारण स्वभावातील काही दोष, मनमानी आचरण व आरोग्यविरोधी सवयी असतात.  व्यसनमुक्ती केंद्रात सर्व आरोग्य विरोधी सवयी व मनमानी आचरण बंद करून आरोग्य वर्धक सवयी व आजारापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक सवयी आत्मसात करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात, त्यामुळे व्यसन विरोधी व्यक्तिमत्व निर्माण होते.

ट्रीटमेंट मॉडेल
ट्रीटमेंट मॉडेल – सदभाव व्यसनमुक्ती केंद्राची उपचार पद्धती हि आधुनिक विज्ञान, मनोअध्यात्मिक चिकित्सा यांचा सुंदर संगम आहे. व्यसनपिडीत व्यक्तीचा शारीरिक, मानसिक व आत्मिक विकास करण्यासाठी समग्र चिकित्सा पद्धतीचा उपयोग केंद्रात केला जातो. त्यासाठी पुढील गोष्टीना प्रमाण मानुन उपचार केले जातात .

१. अंमली पदार्थांचे सेवन करणे हाच मुळात एक मानसिक आजार असून त्याची मूळ कारणे व्यक्तिमत्वातच दडलेली असतात.
२. व्यसनमुक्ती प्रक्रिया हि समग्र(कॉम्प्रेहेन्सिव्ह) असली पाहिजे.
३. व्यसनपीडित  व्यक्तीच्या सर्व नैसर्गिक गरजा भागवून त्याला सुधारण्याची व परिवर्तित होण्याची पूर्ण संधी दिली पाहिजे.
४. व्यसनपीडित  व्यक्तीच्या सर्व मानसिक शंक्तींचा व सद्गुणांचा विकास होण्यासाठी त्याला प्रोत्साहित करून संधी दिली गेली पाहिजे. 
५. व्यसनपीडित व्यक्तीच्या मनात मी व्यसनमुक्त जीवन जगु शकतो असा आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे.
६. व्यसनपीडित व्यक्तीला त्याच्या जीवनातील समस्या सोडवण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे.
७. व्यसनपिडीत व्यक्ती व त्यांच्या कुटुंबाला हीन भावनेने न बघता आजारी समजुन सर्व प्रकारची मदत केली पाहिजे.
८. सदभाव व्यसनमुक्ती केंद्रात व्यसनपीडित व्यक्तींच्या सर्व आरोग्य विरोधी व नकारत्मक सवयी बदलुन त्या ठिकाणी नियम- बद्धता व गतिशीलता आणली जाते.
९. व्यसनपीडित व्यक्तींना एकांतवासात ठेवले जाते. त्यांच्या मानसिक क्षमतांचा व सद्गुणांचा विकास व्हावा यासाठी स्वयंसेवा, साधेपणा , व्यसनमुक्ती केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभावं केला जात नाही.
पत्ता/लोकेशन –
१. जळगाव – सदभाव व्यसनमुक्ती केंद्र, ६६, मयुर कॉलनी, खंडेराव नगर रोड, पिंप्राळा, जळगाव – ४२५००२, महाराष्ट्र, भारत. 
फोन क्र. – 0257 – 2254368, 2250238, 2253812
मोबाईल नं. – +91 9371442253, 8208445814, 8668908936
वेबसाईट  – www.sadbhav.net
ई-मेल  – sadbhavmitra@gmail.com

२. जबलपुर – सदभाव नशामुक्ती केंद्र, जेडीए भवन, शांती नगर, दमोह नाका, युको बॅँक के सामने, जबलपुर – ४८२००१, मध्यप्रदेश, भारत. 
फोन क्र. – 0761-6054999, 4071137
मोबाईल नं. – +91 9325731550, 7879809398, 8208445814, 8668908936
वेबसाईट  – www.sadbhav.net
ई-मेल  – sadbhavmitra@gmail.com
व्यसन्मुक्तची सुत्रे : 
१.  रोज सकाळी लवकर उठावे . 
२.  पी.टी., योगा, प्राणायाम, प्रार्थना, ध्यान करावे. 
३.  पोटभर  नाश्ता करावा. 
४.  व्यसन विरोधी औषधीचे सेवन करावे. 
५.  पूर्ण दिवस आपले काम प्रामाणिकपणे करावे . आळस व कामचोरी करू नये. 
६.  सर्व कामे वेळेवर करावी. 
७.  संध्याकाळी पी.टी., योगा, प्राणायाम व ध्यान करावे. 
८.  डॉक्टरांच्या सल्यानुसार ओषधी सेवन करावी . 
९.  वेळेवर जेवण करून झोपावे. 
१०.  व्यसनी लोकांच्या  सोबतीत राहू नये. जेथे व्यसनाची संभवना असेल अशा कार्यक्रमात जाऊ नये . 
११. व्यसनाचा विचार मनात आल्यास, मनाला आज नाही , आत्ता नाही, नंतर कधी  असा आदेश द्यावा.
सदभाव  परिवाराची सूत्रे : 
१.  कुटुंबात अभद्र शब्द व शिवीगाळ करू नये. 
२.  स्वरक्षणाव्यतिरिक्त कोणत्याही कारणास्तव मारपीट, हिंसा उपद्रव करू नये. 
३.  कुटूंबात कोणाशीही  भेदभाव करू नये. सर्वांशी सहयोग करावा. संयोगानेच विकास होतो व आनंद मिळतो. 
४.  रोज सकाळी घराच्या बाहेर निघताना आपल्या पुर्ण दिवसाचा कार्यक्रम कुटूंबाला सांगावा. आपल्या सर्व मित्राची व परिचितांची माहिती कुटुंबाला द्यावी. 
७. कुटुंबात लहान मुले, महिला व जेष्ठ नागरिक यांची रेषा करावी व त्यांचे पालन पोषण करावे.

व्यसनमुक्ती प्रक्रिया
व्यसनमुक्ती प्रक्रिया – 
व्यसनी व्यक्तीला किंवा तिच्या कुटुंबियांना माहिती देतानाच व्यसनमुक्ती प्रक्रिया सुरु होते. समाजसेवी व्यक्ती किंवा कौंसिलने व्यसनाधीन व्यक्ती व तिच्या कुटूंबियांना व्यसनमुक्ती प्रक्रियेची पुर्ण माहिती देणे व त्यांचे शंका समाधान करणे अत्यंत महत्वाचे असते याला प्री-ट्रीटमेंट कॉऊन्सलिंग असे म्हणतात.

व्यसनमुक्ती प्रक्रियेचे पाच भाग पडतात- 
०१.    शारीरिक सुधार 
०२.    मानसिक सुधार 
०३.    समस्यांचे समाधान 
०४.    चेतना जागृती 
०५.    फॉलोअप व पुनर्वसन

०१. शारीरिक सुधार – व्यैद्यकीय सुधार किंवा उपचारचेही पाच भाग पडतात. 
अ . विरहवेदनाचे नियंत्रण  – कोणतेही व्यसन अचानक बंद केल्यावर व्यसनपीडित व्यक्तीच्या शरीरात अनॆक उपद्रवी लक्षणे दिसू लागतात. उदा. कापरे सुटणे, अंग दुखणे, बेचैनी वाटणे, उलट्या-मळमळ होणे, नाकातून डोळ्यातून पाणी येणे, जांभया येणे, भ्रम होणे इत्यादी. या लक्षणांना विरह वेदना असे म्हणतात. काही वेळा या विरह वेदना जीवघेण्या असतात. व्यसनमुक्ती केंद्रातील तज्ञ मंडळी औषधोपचाराच्या साहाय्याने विरह वेदनांचे नियंत्रण व उपचार करतात. तथापि घरी व्यसन सोडू इच्छिणाऱ्या लोकांना विरह वेदनांचा धोका असतो. तसेच विरह वेदनांच्या भीतीमुळेच व्यसनी लोक घरी व्यसन सोडण्यात यशस्वी होत नाहीत. उलट अनेकदा मेडीकल प्रॉब्लेम उत्पन्न होतात व मग हॉस्पीटलकडे धाव घ्यावी लागते. 
ब.  निर्विषीकरण(डिटॉक्सिफिकेशन) – अमली पदार्थ हे स्लो पॉइझन असतात. दीर्घकाळ व्यसन केल्यानंतर हे विष आपल्या सर्व शरीरात पसरते व त्याचे दुष्परिणाम होतात. विशेषतः लिव्हर, मूत्रपिंड, त्वचा इत्यादी अवयवांवर अंमली पदार्थांचे दुष्परिणाम तीव्रतेने जाणवतात. लिव्हरवर सूज येते. तर काही वेळा जलोदरही होतो. तज्ञ डॉक्टर्स पूर्ण तपासणी करून औषधोपचार करतात. २ ते ३ आठवड्यात निर्विषीकरणाचे काम पूर्ण होते. 
क.  कुपोषण दूर करणे – व्यसनपीडित व्यक्ती व्यसनाधीन असतांना व्यवस्थित व पोटभर जेवत नाही. त्याच्या जेवणात समतोल आहार नसतो, तर अनेकदा तो जेवतही नाही, याचा परिणाम म्हणून त्यांचे शरीर कुपोषित होते. सद्भाव व्यसनमुक्ती केंद्रात साधे संतुलित जेवण, दूध व केळी असा आहार दिला जातो. त्यामुळे एका महिन्यात व्यसनपीडित व्यक्तिचे कुपोषण दूर होते. त्यामुळे २ ते ५ किलो वजन वाढते. 
ड.  अन्य आजारांचा उपचार – व्यसनपीडित व्यक्तीला व्यसनामुळे अनेक आजार जडतात. पण व्यसनाच्या बेहोषीत त्याला त्या आजाराची जाणीव होत नाही. व्यसनमुक्ती केंद्रात अंमली पदार्थांचे सेवन बंद झाल्यामुळे व्यसनपीडित व्यक्तीचे शरीर संवेदनशील होते व त्याला छोट्या-मोट्या आजारांची जाणीव व्हायला लागते. या सर्व आजारांची तपासणी व उपचार सद्भाव व्यसनमुक्ती केंद्रात होतात. 
इ.   आरोग्यवर्धक सवयी आत्मसात करणे – व्यसन लागण्याचे मुख्य कारण स्वभावातील काही दोष, मनमानी आचरण व आरोग्यविरोधी सवयी असतात.  व्यसनमुक्ती केंद्रात सर्व आरोग्य विरोधी सवयी व मनमानी आचरण बंद करून आरोग्य वर्धक सवयी व आजारापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक सवयी आत्मसात करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात, त्यामुळे व्यसन विरोधी व्यक्तिमत्व निर्माण होते.
आरोग्यवर्धक सवयी – 
आपले आरोग्य चांगले राहावे व व्यसनमुक्त जगता यावे यासाठी आरोग्य विरोधी सवयीचा त्याग करून आरोग्य वर्धक सवयी आचरणात आणल्या पाहिजेत. आरोग्यवर्धक सवयी ह्या नेसर्गिक आहेत. म्हणून आपण त्या नम्रतेने व श्रद्धापूर्वक आचरणात आणल्या पाहिजेत. अहंकार व अन्य व भ्रमापायी आपण आरोग्यविरोधी सवयीचे गुलाम बनतो. हि गुलामी सोडल्याशिवाय व्यसनमुक्त जीवन जगता येणार नाही हे लक्षात ठेवावे.                       
०१.  शरीर, निवास व पर्यावरणाची स्वच्छता ठेवावी. 
०२.  भरपूर परिश्रम व नियमित व्यायाम करावा. 
०३.  सुनियोजित व सुनियंत्रित दिनचर्या आत्मसात करावी. 
०४.  साधे, संतुलित भोजन घ्यावे. 
०५.  डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेऊ नये. 
०६.  क्रोध, दुःख, चिंता, भय, निराशा इत्यादी दुःखद भावना नियंत्रित ठेवाव्यात. 
०७.  संयमित, विवेकशील आचरण असावे.  
०८.  साधेपणा, स्वयंसेवा, सहयोग, सद्भाव इत्यादी सद्गुण आत्मसात करावे. 
०९.  आजाराचे मुल कारण दूर  करावे, आपल्या आचरणात आरोग्यदायी सवयी आणाव्यात. केवळ औषधांवर अवलंबुन राहू नये. 
१०.  अमली पदार्थांचे व्यसन, जुगार, सट्टा, लॉटरी , वेश्यागमन इत्यादी दुर्गुणांचा नेहमीसाठी त्याग करावा.
अॅसिडिटी पासून बचावाचे उपाय – 
०१. सर्व आरोग्यवर्धक सवयी आचरणात आणाव्यात. 
०२. कोणत्याही अंमली पदार्थाचे व्यसन करू नये. 
०३. साधा, सात्विक व संतुलित आहार घ्यावा. 
०४. तामसी भोजन करू नये. भोजनात मीठ, तिखट, तेल,  साखर व मसाल्याचे पदार्ध यांचे प्रमाण कमीत कमी ठेवावे. 
०५. कोल्ड्रिंक्स, बेकारीचे पदार्थ, फास्ट फुड, तळलेले पदार्थ, शिळे अन्न यांचे सेवन करू नये. 
०६. उपाशी राहू नका किंवा गरजेपेक्षा जास्त खाऊ  नका. भोजनाचे ३ ते ४ सामान भाग करून दर ४ ते ५ तासांनी खावे. 
०७. डॉक्टरांचे सल्ल्याशिवाय औषधी सेवन करू नये. 
०८. मनमानी दिनचर्या सोडून सुनियोजित व सुनियंत्रित दिनचर्या आचरणात आणावी.
०९. दिवसा झोपू नका. रात्री जागरण करू नका. 
१०. भरपूर परिश्रम, नियमित व्यायाम  करा. 
११. कडक, मिठी चहा पिऊ नका. चहा ऐवजी थंड दूध, गवती चहा किंवा हलका चहा घ्या. चहाची पूड पाण्यात टाकून उकळू नका. 
१२. क्रोध, भय, दुःख, चिंता, निराशा इत्यादी भावनांवर नियंत्रण ठेवा. 
१३. अॅसिडीटीचे कारण शोधून ते दूर करा. अॅसिडिटीची औषधी दीर्घकाळ सेवन केल्याने गंभीर दुष्परिणाम होतात. अॅसिडिटी हा आजार नसून तो आपल्याला पोटाने दिलेला इशारा किंवा लाल सिग्नल आहे. आपण सावध होऊन आरोग्य विरोधी सवयींचा त्याग केला पाहिजे.
जुलाब/डायरिया पासून बचावाचे उपाय – 
०१. सर्व स्वास्थवर्धक सवयी व अॅसिडिटीची बचावाचे उपाय आत्मसात करावे.  
०२. जुलाब लागताच जेवण बंद करावे व भरपूर प्रमाणात पाणी वारंवार प्यावे. 
०३. पाण्यामध्ये एक लहान चमचा मीठ, साखर आणि लींबू टाकून किंवा इलेकट्रॉल पावडर घेऊ शकतो. 
०४. लोपरमाईड गोळ्यांचे सेवन दिवसातून ३ ते ४ वेळा प्रत्येक वेळी २-२ गोळ्या असे करावे. 
०५. जुलाब बंद झाल्यावर मात्र लोपरमाईड गोळ्यांच्या सेवन बंद करावे. 
०६. जुलाब बंद झाल्यावर एक दिवसानंतर कडक भूक लागल्यास केळी व ताज्या गोड दही चे सेवन करावे. 
०७. केळी व ताजे दही याचे सेवन कमीत कमी दोन दिवसापर्यंत करावे, त्यानंतर भाजी-पोळी, वरण=भात असा आहार सुरु करावा. 
०८. जुलाबासोबत पोटात दुखणे किंवा मुरडा येणे व रक्त पडणे अशी लक्षणे दिसत असल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मलावरोधापासून बचाव – 
०१. सर्व स्वास्थवर्धक सवयी आत्मसात कराव्यात. 
०२. कोणतेही व्यसन करू नये. 
०३. भरपूर पाणी वारंवार प्यावे. 
०४. सकाळी ब्रश केल्यानंतर कोमट पाणी भरपूर प्यावे. 
०५. पी.टी.योगा नियमित करावे. तसेच पूर्ण पवनमुक्तासन व पायाच्या पंज्यावर उभे राहून उड्या माराव्यात. 
०६. केंद्रांच्या सल्ल्यानुसार औषधी सेवन करावी.
मूळव्याध/बवासीर/पाइल्स पासून बचाव – 
०१. सर्व आरोग्यदायी सवयी आचरणात आणाव्यात. 
०२. कोणतेही व्यसन करू नये. 
०३. अॅसिडिटी, जुलाबा व मालविरोधापासून बचाव करण्याचे सर्व उपाय देखील आचरणात आणावेत. 
०४. दिवसभर भरपूर पाणी वारंवार प्यावे. 
०५. सकाळी ब्रश केल्यावर कोमट पाणी भरपूर प्रमाणात प्यावे. शक्य झाल्यास केंद्राच्या सल्यानुसार औषध घ्यावे. 
०६. दैनंदिन व्यायाम संपल्यावर पूर्ण पवनमुक्तासन व पायाच्या पंज्यावर उभे राहून उड्या मारण्याचा व्यायाम भरपूर प्रमाणात करावा.  
०७. गुदद्वाराला मुळाव्यादचे मलम रात्री झोपताना व दिवसातून ३ ते ४ वेळा लावावे. 
०८. हिरव्या पालेभाज्या, फळे व फायबरमुक्त पदार्थांचे भोजन करावे. तामसी भोजन, मांसाहार घेऊ नये. 
०९. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुळव्याधाच्या कोम्बाचे ऑपरेशन करून घ्यावे.
झोप न येणाची कारणे व उपाय:=
भौतिक कारणे – 
०१. कडाक्याची थंडी, उकाडा, भूक, तहान किंवा कोणत्याही प्रकारचा आजार, गोंगाट, मच्छर, दुर्गंध इत्यादी कारणांमुळे सुद्धा माणसाला झोप येत नाही. 
०२. परिश्रम व व्यायामाचे अभावी सुद्धा झोप येत नाही. झोप येण्यासाठी झोपेचा आनंद घेण्यासाठी दिवसभर भरपूर परिश्रम केले पाहिजे व व्यायामही केला पाहिजे. 
०३. सुनियोजित व सुनियंत्रित दिनचर्या  ठेवल्याने चांगली झोप लागते. 
०४. दिवसा झोप घेतल्यामुळे रात्री झोप येत नाही. 
०५. दिवसा परिश्रम व व्यायाम करून रात्री चांगली झोप घ्यावी. 
०६. झोप येणे हि एक प्राकृतिक अवस्था आहे, तिला प्राप्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या औषधीचे सेवन करू नये. 
०७. क्रोध, दुःख, चिंता, भय, निराशा इत्यादी सारख्या अनियंत्रित दुःखद भावनांमुळे झोप लागत नाही. 
०८. झोप येण्यासाठी कुठल्याही औषधीचे किंवा व्यसनाचे सेवन करू नये. अन्यथा त्याचा दुष्परिणाम मेंदूवर होऊन मानसिक व शारीरिक आजार उदभवतात.
झोप येण्यासाठी व्यावहारिक उपाय – 
०१. झोपेची वेळ पक्की व निश्चित करून घ्यावी. 
०२. रोज निर्धारित वेळेवर आपल्या बिछान्यावर झोपून जावे. 
०३. आपल्या शरीराला शांत, निष्क्रिय व तणावमुक्त करावे. 
०४. झोपण्यासाठी डोळ्यांवरती पट्टी बांधून या अवस्थेत सकाळी ६ वाजेपर्यंत पडून रहावे, आपल्या मनाला हि शांत, निष्क्रिय व तणावमुक्त ठेवावे. या मानसिक अवस्थेला प्राप्त करण्यासाठी निशब्ध होऊन मनातल्या मनात, निरंतर कुठल्याही प्रकारचा मंत्र, गाणे, गुणगुणावे. काही वेळानंतर झोप लागून जाईल. 
०५. झोप ही एक प्राकृतिक अवस्था आहे, ज्यात शरीर व मन तणावमुक्त झालेले असते. 
०६. तणावमुक्त राहण्यासाठी पी. टी. योग, ध्यान व प्राणायाम यांची मदत घ्यावी.
०७. झोप येण्यासाठी कोणतेही औषध किंवा अंमली पदार्थांचे सेवन किंवा व्यसन करू नये. 

सद्भाव व्यसनमुक्ती केंद्रात रोज सकाळी व सिध्दकाली पि.टी., योग, प्रार्थना, प्राणायाम, मौन व ध्यान शिकवितात व करायला लावतात. तसेच साधी राहणी, सहयोग, स्वयंसेवा, सहजीवन इत्यादी सद्गुणांमुळेच व्यसनपीडित लोकांना आजाराची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपायांची सखोल माहिती दिली जाते व आरोग्यवर्धक सवयी आत्मसात करण्यासाठी प्रेरित केले जाते.

मानसिक सुधार
मानसिक सुधार = 
अनेक लोकांना शारीरिक सुधारणा झाली कि व्यसनमुक्ती व्यक्ती ही केंद्रांतून घरी जाण्यासाठी उतावळी झालेली असते. मी आता बरा झालो आहे बाकीची ट्रीटमेंट घरी होईल. तेव्हा आता मला घरी जाऊ द्या असे वारंवार सांगितले जाते. तथापि शारीरिक सुधार झाल्यानंतरच व्यसनमुक्तीचा प्रारंभ होतो. मानसिक सुधार याचा अर्थ व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये असते. अवैज्ञानिक विचार धारा, दूषित दृष्टिकोन व अनियंत्रित जीवनशैली या व्यसनाकडे नेणाऱ्या बाबी आहेत. व्यसनमुक्तीसाठी व्यक्तीला आपले दोष व वाईट सवयींचा दोष घेवून त्यात बदल घडवून आणणे गरजेचे असते.
मानसिक सुधाराचे चार गटात कार्य होते – 
अ . आत्मजागृती – 
आत्मजागृती याचा अर्थ पच्छातापाची भावना व सुधार करण्याची तीव्र इच्छा होय. आत्मजागृतीमुळे व्यसनपीडित व्यक्तीच्या मनात पुढील भावना जागृत होतात. 
०१. व्यसन करणे हि माझी सर्वात मोठी चूक होती व आहे. 
०२. व्यसन करणे म्हणजे शुद्ध मुर्खता आहे. त्यात कोणतेही शौर्य, शहाणपणा किंवा पुरुषार्थ नाही. 
०३. माझ्या व्यसनाधीनतेमागे इतर कोणी जबाबदार नसून त्यासाठी माझ्यातील दोष कारणीभुत आहेत. 
०४. मी व्यसनमुक्तीसाठी बिनशर्त, विनाविलंब तयार आहे. 
०५. व्यसनमुक्तीसाठी मी माझे, कुटुंब व व्यसनमुक्ती केंद्राचे नियंत्रण स्विकार करीत आहे. 
०६. व्यसनमुक्ती माझ्यासाठी सर्वात पवित्र अत्यंत आवश्यक कार्य आहे.
आत्मपरीक्षण – 
आत्मपरीक्षण याचा अर्थ आपल्या व्यक्तिमत्वातील दोष, कमीपणा, किंवा न्यून, वाईट सवयी यांचा शोध घेणे होय. आत्मनिरीक्षण केल्याशिवाय आपण सुधार कशात करणार? अर्थात आत्मपरीक्षण करणे सोपे नसते. ते मनाच्या विरोधी कार्य आहे. आपल्या मनाला नेहमी दुसऱ्यांचे दोष शोधण्याची सवय असते. आता  मात्र आपले स्वतःचे दोष शोधावयाचे आहे. आत्मपरिक्षणासाठी दोन पद्धतीचा वापर करतात. 
अ. तोंडी आत्मकथन – यात किमान ४ ते ५ व अधिकतम ९ ते १० व्यसनपीडित लोकांचा समूह सहभागी होतो. समूहातील प्रत्येक व्यक्ती एका निश्चित विषयावर साक्षी भावाने तठस्थपणे आपला भूतकाळ सांगतो. आपला अनुभव सांगताना कोणत्याही प्रकारची भीती, संकोच, किंवा लाज असता कामा नये. आत्मकथनामुळे आपले दोष व वाईट सवयी यांचा शोध घेता येतो. तसेच इतरांच्या अनुभवावरून शिकता येते. प्रामाणिक आत्मकथन हा फार महत्वाचा गुरु असतो. 
ब. लेखी स्वाध्याय – जे आत्मकथन तोंडी सांगितले त्याचे विस्मरण होण्याची शक्यता असते व इतरांच्या मदतीने सल्ला घेता येत नाही. यासाठी आत्मकथनाला विस्तारपूर्वक व संक्षेपात अशा दोन्ही पद्धतीने लिहिले जाते, यास स्वाध्याय म्हणतात. 
आत्मकथनाचे विषय-
१. कौटूंबिक परिचय( आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक) 
२. बालपण कसे गेले?( वर्ष ६ ते ११ पर्यंत) 
३. किशोरावस्था( १२ ते १७ वर्ष) 
४. युवावस्था( १८ ते ३५ वर्ष) 
५. प्रौढावस्था( ३५ ते ६०) 
६. पारिवारिक नियंत्रणाची स्थिती 
७. आपल्या वाईट सवयी 
८. कोणी कोणते व्यसन किती कालावधीसाठी केले?
९. व्यसन कोणत्या परिस्थितीत व कसे लागले?
१०. व्यसनापायी कौटुंबिक कलह 
११. व्यसनापायी सामाजिक मानहानी 
१२. व्यसनापायी झालेले आजार 
१३. व्यसनापायी झालेले आघात 
१४. व्यसनापायी पोलीस वा कोर्ट केस. 
१५. व्यसनापायी आर्थिक हानी 
१६. व्यसन सोडण्याचे प्रयत्न व अपयशाची कारणे. 
आत्मचिंतन  – 
आत्मचिंतन याचा अर्थ सुधारणा व परिवर्तनाचा निश्चित व पक्का कार्यक्रम तयार करणे होय. आपल्या दोषांचे व वाईट सवयींचें तसेच समस्यांचे निराकरण करण्यासाठी इतरांच्या मदतीने व सल्ल्याने सुधारणेचा कार्यक्रम निश्चित स्वरूपात केला जातो. यात शारीरिक सुधारणा, उत्पन्न वाढविणे, खर्चाचे बजेट बनविणे व मुक्त होणे. कौटुंबिक संबंध सुधारणे इत्यादींचा समावेश होतो.
आत्मपरिवर्तन – 
आत्मपरिवर्तनाचा अर्थ सुधारणेचा व परिवर्तनाचा जो निश्चित कार्यक्रम बनविला गेला त्याला विनाविलंब बिनशर्त आचरणात आणणे होय. परिवर्तन किंवा सुधारणा आचरणात आणतांना आज अभी इसी वक्त (आज आता याच क्षणी ताबडतोब) हे सूत्र लक्षात ठेवावे.

समस्यांचे समाधान
समस्यांचे समाधान – 
व्यसनपीडित व्यक्तीच्या जीवनात अनेक समस्या असतात. काही समस्या व्यसन सुरु होण्याआधीच्या असतात. तर काही समस्या व्यसनांमुळे निर्माण आलेल्या असतात. या सर्व समस्यांची उकल होणे व व्यसनपीडिताचा आत्मविश्वास  जागृत करणे आवश्यक असते. त्यासाठी व्यसनपीडिताला आपल्या समस्यांचे  – १.वास्तविक समस्या व २.काल्पनिक समस्या असे विभाजन करायला शिकविले जाते. ज्या समस्या व्यक्तिच्या गरजांमुळे निर्माण होतात त्यांना वास्तविक समस्या म्हणतात. तर ज्या समस्या व्यक्तीच्या इच्छांमुळे निर्माण होतात त्यांना काल्पनिक समस्या म्हणतात. व्यसनी माणसाच्या जीवनात पुढील समस्या असतात. अ. शारीरिक समस्या , ब. वैवाहिक समस्या, क. व्यक्तिमत्वाच्या समस्या, ड. लैगिक समस्या, इ. आर्थिक समस्या, ई. सामाजिक समस्या, उ. कौटुंबिक  समस्या.
चेतना जागृती – व्यसनपिडीत व्यक्तीची विवेक बुद्धी, आत्मा किंवा चेतना जागृत करणे हि बाब अत्यंत महत्वाची असते. त्यामुळे व्यसनपिडीत व्यक्तीला आपल्या जीवनाचे महत्व, आपले कर्तव्य, जबाबदाऱ्या यांची जाणीव करून देणे व जीवनात रस निर्माण करणे यासाठी प्रयत्न केला जातो.
फॉलोअप व पुनर्वसन – व्यसनमुक्ती केंद्रातील चांगल्या व्यसनाविरोधी सवयी पुढील आयुष्यात निरंतर राहाव्यात व व्यक्ती व्यसनाकडे पुन्हा जाऊ नये, यासाठी कुटुंबाने फॉलोअप कार्यक्रम निरंतर अखंडपणे राबविला पाहिजे, त्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात मोफत तपासणी व कौन्सलिंगची सोय असते. याशिवाय पत्राद्वारे व दूरध्वनीद्वारे ही संपर्क ठेवला जातो. व्यसनमुक्ती केंद्र विविध कार्यक्रमाचे आयोजन करून फॉलोअप कार्यक्रम सुरु ठेवते.

SADBHAV
Contact Information
JALGAON – Sadbhav Rehabilitation Center
66, Mayur Colony,Pimprala,
Jalgaon, Maharashtra

Contact Information:
Phone: +91 (0257) 2254368
Mobile: +91 9325731550, 8208445814, 8668908936
Email: sadbhavmitra@gmail.comred.swastik@yahoo.in

Contact Information
JABALPUR – Sadbhav Rehabilitation Center
JDA Building, Shanti Nagar, Damoh Naka, Opp. Uco Bank, Jabalpur,
Madya Pradesh, India 482001

Contact Information:
Phone: +91 (0761) 6054999
Mobile: +91 9325731550, 8208445814, 8668908936
Email: sadbhavmitra@gmail.comred.swastik@yahoo.in

Contact Information
INDORE – Sadbhav Rehabilitation Center
401, AD Regency, Near Bombay Hospital, Service Road
Indore, Madhyapradesh

Contact Information:
Phone: 0731-4088102
Mobile: +91 9325731550, 8208445814, 8668908936
Email: sadbhavmitra@gmail.comred.swastik@yahoo.in

Contact Information
BURHANPUR – Sadbhav Rehabilitation Center
Main Road, Opp. Bajaj Show Room, KHAKNAR,
Dist. Burhanpur, Madya Pradesh, India

Contact Information:
Phone: +91 8208445814
Mobile: +91 9325731550, 8208445814
Email: sadbhavmitra@gmail.comred.swastik@yahoo.in

How to Reach Jalgaon Centre
By Rail

Jalgaon is a junction railway station, on Mumbai-Bhusawal-Nagpur and Mumbai-Bhusawal-Delhi, Surat-Bhusawal railway line. Jalgaon is on at 25 km distance from Bhusawal JN., It is 420 km away from Mumbai, 400 km away from Nagpur, 300 km from Surat, 250 km from Indore via Khandwa JN by rail, it is 300 km away from Pune, It’s 150 km away from Aurangabad away by rail via Manmad JN, and 60 km.


By Road

It is 420 km away from Mumbai, 400 km away from Nagpur, 300 km from Surat, 250 km from Indore by road, it is 300 km away from Pune, It’s 150 km away from Aurangabad away by road, and 60 km away from famous Ajanta Caves by road, and 90 km from Dhuliya by NH-6.


By shared rickshaw

These are available from Jalgaon station, Bus Stand and from any where any time.


By private vehicle

  The driving directions are:
  If you coming from Jalgaon city. Take Pimprala road going towards the Pimprala
  Turn left towards the Hudco at the end of Khanderao Nagar road
  Come only 50 Meter distance forward by Khanderao nagar road, Sadbhav building is on your left.

AND ALSO

  If you coming by Highway from Bhusawal/Aurangabad/Pachora.
  Take National Highway going towards Dhule.
  After crossing the railway bridge, second stop is Gujral Petrol Pump at Right hand side,Turn left towards the Pimprala at the end of Pimprala,
  Take right towards the Hudco road at the end of Khanderao nagar road,Come only 50 Meter forward by Khanderao nagar road, Sadbhav building is on your left.

AND ALSO

  If you coming by Highway from Dhule/Amalner/Chopda.
  Take National Highway going towards Jalgaon.
  After crossing the Khote nagar stop, first stop is Gujral Petrol Pump at Left hand side,
  Turn Right towards the Pimprala at the end of Pimprala,
  Take right towards the Hudco road at the end of Khanderao nagar road,
  Come only 50 Meter forward by Khanderao nagar road, Sadbhav building is on your left.
How to Reach Jabalpur Centre
Sadbhav Rehab Centre, Jabalpur is situated on Main Road going to Katni Near Damoh Naka. It is 4 km. away from Madan Mahal Railway Station and 6 km away from Main Railway Station. Auto Rickshaw, city Bus are available.

How to Reach Inodre Centre
Sadbhav Rahab Centre at Indore is situated Near very famous Bombay Hospital, on Service Road. It is very near to saty sai Chowk on Bombay-Agra Highway. Auto Rickshaw, city bus are available.